जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास उद्यापासून सुरुवात होणार असून नबाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह शेतकरी कर्जमुक्ती, वीज, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था आदी अनेक विषय अधिवेशनात गाजणार आहेत.
उद्या गुरुवार, दि.३ मार्च पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. गेल्या सप्ताहात इडीने अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहीमच्या संबंधित मालमत्ता खरेदी प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेत अटक केघेतले आहे. मलिक यांनी राजीनामा दिल्याशिवाय अधिवेशनाचे कामकाज होऊ दिले जाणार नाही अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली असून नबाब मलिक यांचा राजीनामा मागणीसह अन्य बाबींवर विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार असल्याचे दिसून येत आहे.
कुख्यात दाऊद इब्राहीमच्या नातेवाईकांबरोबर केलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माविआचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक अटक केली. गुन्हेगारांशी संबंध असलेल्या मलिकांच्या राजीनाम्यापर्यंत अधिवेशनाचे कामकाज होऊ दिले जाणार नाही, मंत्री मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गुरुवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार, पुण्याजवळील लवासा प्रकरणी न्यायालयाचे ताशेरे, शेतकरी कर्जमुक्ती केवळ कागदावर असून अजूनही या योजनेच्या लाभापासून हजारो शेतकरी वंचित आहेत. शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणे, वेळेवर वीजपुरवठा नसणे, कायदा व सुव्यवस्था यासह अन्य मुद्दय़ांवर आवाज उठविणार आहे. असा इशारा भाजपने दिला आहे.
तर दुसरीकडे, सरकारी यंत्रणांचा केंद्र गैरवापर करित असून विनाकारण मविआच्या मंत्री आमदारांना टार्गेट करित त्रास दिला जात आहे, या वरून सत्ताधारी महाविकास आघाडी भाजपला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. तसेच मलिक यांच्यावर सूडबुद्धीने मालमत्तेचे जुने प्रकरण उकरून काढून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात येऊ नये, अशी भूमिका आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांची आहे.