डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी तिन्ही डॉक्टर निलंबित

dr.payal tadavi

मुंबई (वृत्तसंस्था) येथील नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांना आज तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात ‘मार्ड’ने ही कारवाई केली आहे.

 

डॉ. पायल पायल तडवीने वरिष्ठ सहकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल तोंडी व लेखी तक्रार केली होती. परंतू तरी देखील संबंधितांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे एका उमद्या डॉक्टरचा जीव गेल्याचे ‘मार्ड’चे म्हणणे आहे. पायलने २२ मे रोजी आत्महत्या केली होती. पायलच्या आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात २३ मे रोजी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे, रॅगिंग व अट्रॉसिटी कायद्याखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज एसएफआय, डीवायएफआय, जनवादी महिला संघटना, जातीअंत संघर्ष समिती अशा विविध संघटनांनी एकत्र येत नायर रुग्णालयाबाहेर संतप्त निदर्शने केली आहे. तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेत नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस पाठवली आहे.

Add Comment

Protected Content