गोदावरी फाऊंडेशनतर्फे स्व.राजीव गांधी यांना अभिवादन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांतर्फे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्व.राजीव गांधी यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे शनिवार दि.२१ मे रोजी देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्‍त अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम एमबीबीएस उत्‍तीर्ण झालेल्या विद्यार्थीनींच्या हस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले.

याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांच्यासह स्टुंडट सेक्शनमधील कर्मचारी वर्ग उपस्थीत होता. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी स्व.राजीव गांधी यांनी पंतप्रधान काळात केलेल्या जनहिताच्या कार्याला उजाळा दिला.

यासोबतच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील रुग्णालय, सावदा व भुसावळ येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, गोदावरी सीबीएसई स्कुल, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, विधी व विज्ञान महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील कृषी व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, डॉ.उल्हास पाटील होमियोपॅथी तसेच फिजीयोथेरपी महाविद्यालयातही स्व.राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले.

 

Protected Content