रावेर पंचायत समितीकडून पोलिस प्रशासनाने मागविले लाभार्थ्यांचे प्रस्ताव

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर पंचायत समितीकडून शौचालय प्रकरणात अनुदान वर्ग केलेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागणीसाठी पोलिस प्रशासनाने पत्र दिले आहे. यासोबत रावेर शहराबाहेर असलेल्या काही बँक शाखांकडील याद्या येण्याच्या बाकी आहे. आरोपी ताब्यात मिळाल्यावर या गुन्ह्यातील दोषींचे अटकसत्र हाती घेण्यात येणार आहे.

 

रावेर पंचायत समिती झालेल्या शौचायल भ्रष्ट्राचाराचा तपास सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक करीत आहे. त्यांच्याशी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, शौचालय भ्रष्ट्राचार योजनेच्या तपास कामी रावेर शहरात असलेले सर्व बँकांनी लाभार्थीच्या याद्या आम्हाला दिले आहे. परंतु, रावेर शहराबाहेर असलेले एसबीआय बँक शाखा, पंजाब नॅशनल बँक शाखा, सेंट्रल बँक शाखा, यूनियन बँक शाखा गावपातळीवर असलेल्या बँकामधून निधी वर्ग झालेल्या लाभार्थीची यादी येण्याची बाकी आहे. शौचालय योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीचे प्रस्ताव देखिल मागविले आहे. परंतु, अद्याप आम्हाला पंचायत समितीकडून प्रस्ताव मिळाले नाही. दोन्ही आरोपींचा शोध सुरु असून त्यांची अटक झाल्या नंतरच योजनेत अजुन इतर आरोपी वाढणार असल्याचे तपास अधिकारी श्री नाईक यांनी सांगितले.

Protected Content