Home क्राईम दारावर लघुशंका केल्याच्या किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

दारावर लघुशंका केल्याच्या किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

0
62
knife and blood 696x447
knife and blood 696x447


knife and blood 696x447
 

शिर्डी (वृत्तसंस्था) आपल्या दारावर लघुशंका केल्याच्या रागातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना शिर्डीतील निमगाव परीसरात घडली आहे.

 

शिर्डीतील निमगाव परीसरात ठाकूर कुटुंबीय आणि अर्जुन पन्हाळे शेजारी राहतात. त्यांच्यात सतत किरकोळ कारणावरून वाद होत असायचे. मात्र, शनिवारी साडेसहा वाजेच्या सुमारास दारावर कुणीतरी लघुशंका केल्याच्या रागातून त्यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि पन्हाळेने ठाकूर कुटुंबियांवर याने धारदार कोयत्याने हल्ला चढविला. आरोपी पन्हाळेने पाच जणांवर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये 62 वर्षीय नामदेव उर्फ दादा ठाकूर, 50 वर्षीय दगडूबाई आणि 16 वर्षीय खुशी ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र ठाकूर आणि तावू ठाकूर या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांना शिर्डीच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आरोपी अर्जून पन्हाळेला अटक केली.


Protected Content

Play sound