१६ एप्रिल ही संदर्भीय तारीख ; त्यादिवशी निवडणूक नाहीच

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला ठरल्याचे निवडणूक आयोगाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या पत्रावरील तारीख ही संदर्भ म्हणून घेतली असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे १६ एप्रिलला निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या सीईओंच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल एका पत्रावर १६ एप्रिल २०२४ ही लोकसभा निवडणुकीची तारीख गृहीत धरली गेली. ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्याने निवडणूक आयोगाला त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.

निवडणूक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारीख वापरल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. १६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नाही, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

Protected Content