पोलीस स्थानकातच निरीक्षकाची गळफास घेवून आत्महत्या

यवतमाळ (वृत्तसंस्था) यवतमाळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या कक्षात गळफास लावून आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. राजू उईके असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

 

राजू उईके हे नेहमी प्रमाणे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आपल्या कक्षात बसून बसून काम करत होते. सकाळी काही पोलीस शिपाई त्यांच्या कक्षात गेले तेव्हा त्यांना उईके हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. राजू उईके यांनी आत्महत्या का केली? याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. परंतू कामाचा ताणाबरोबरच जात वैधता प्रमाणपत्राच्या कारणावरून ते तणावात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, यवतमाळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सोयरे यांनी त्वरित पोलीस ठाणे गाठले होते.

Protected Content