४ जून नव्हे या तारखेला होणार दोन राज्यातील विधानसभेची मतमोजणी; आयोगाने तारीख बदलली

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक आयोगाने १६ मार्च शनिवार रोजी लोकसभा आणि चार राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या. यात लोकसभा आणि अरूणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडीशा, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभेसाठी निवडणूका होणार आहेत.

आयोगाने लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभेसाठी चार राज्यात मतमोजणीची तारीख ४ जून ठेवली होती. परंतू आयोगाने आता अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यात मतमोजणीची तारीख २ जून ठेवण्यात आली आहे. कारण या दोन्ही विधानसभेचा कार्यकाळ २ जूनला पूर्ण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी मतमोजणी २ जूनपर्यंत पूर्ण झाली पाहिजे.

अरुणाचल प्रदेशातील ६० विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. तिथे पहिल्या टप्प्यात मतदान १९ एप्रिल रोजी होईल. सिक्कीम राज्यातील ३२ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. तिथेही पहिल्या टप्प्यात मतदान १९ एप्रिल रोजी होईल. त्यानंतर दोन्ही राज्यात २ जून रोजी मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर करण्यात येईल.

Protected Content