नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दोन वर्षापूर्वी नाशिकमध्ये गोळीबार झाला होता. त्यात आरपीआयचे शहराध्यक्ष असलेले प्रशांत जाधव जखमी झाले होते. मात्र त्यावेळी कोणालाही पकडण्यात आलं नव्हतं. मात्र तब्बल दोन वर्षानंतर पोलीसांनी या प्रकरणी पहिली अटक केली आहे. शिवाय यात ठाकरे गटाचे नेते आणि नाशिक जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. बडगुजर यांनी तर हा गुन्हा खोटा असल्याचा दावा केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर दबावाचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी या निमित्ताने केला आहे.
नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनमध्ये दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी आरपीआयचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला होता. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर यामध्ये संशयित आरोपी अंकुश शेवाळे याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी अंकुश शेवाळे यांच्या जबावातून दीपक सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुजर हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी हा गुन्हा दबावातून दाखल केला असल्याचा आरो केला आहे. शिवाय आपला मुलगा निर्दोष असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणातील आरोपीला रूग्णालयात आणण्यात आले होते त्यावेळी ठाकरे सेनेच्या सैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवाय निवडणूकीच्या तोंडावर दबाव टाकण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचा आरोपी शिवसैनिकांनी केला आहे. शिवाय दोन वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात आता तक्रार दाखल केली कशी जाते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.