‘या’ तारखेपर्यंत महायुतीचे जागावाटप निश्चित होईल – भाजप प्रदेशाध्यक्ष

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महायुतीचे जागावाटपात तिढा अजूनही कायम आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, नागपूर येथे शनिवारी रामगिरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जागा वाटपाबाबत चर्चा झाली. पुढील दहा दिवसांत १० तारखेपर्यंत जागावाटप चर्चा पूर्ण होईल. पत्रकार परिषद घेऊन आमचे नेते जाहीर करतील.

पुढे बावनकुळे म्हणाले की, काही जागांबाबत चर्चा झाली. यात कोणी कुठलीही आकडेवारी मांडली नाही. जिथे जो जिंकेल त्याला ती जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मित्रपक्षांनाही जागा देण्याबाबत चर्चा झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. जागा किती कोणाला मिळाव्या हे महत्त्वाचे नाही. राज्यात आमच्या योजना पुढे नेण्यासाठी महायुतीचे डबल इंजिनचे सरकार हवे आहे. जागेचा आग्रह नाही, जिंकण्याला प्राथमिकता आहे. सोबत १३ मित्रपक्ष आहेत. त्यांचाही विचार करणार आहोत.

 

Protected Content