यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील एका निर्माणधीन पुलाचे छत कोसळ्याने यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन कशा प्रकारे निकृष्ठ प्रतिची कामे केली जात असल्याचे हे प्रत्यक्ष दिसुन आलेला प्रकार आहे. सदरच्या पुलाचे छत कोणत्या कारणाने कोसळले याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी समोर येत आहे .
या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की, तालुक्यातील डोंगर कठोरा ते सातोद वड्री या सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या जंगल परिसरात मागील काही दिवसापासुन लाखो रुपये खर्च करून एका मोरी पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. दरम्यान, पुलाचे छत टाकण्याचे काम करण्यात आले व काही तासातच या पुलाचे छ्त अचानक कोसळुन जमीनदोस्त झाले. सुदैवाने पुलाचे छ्त कोसळले त्याप्रसंगी तिथं काम करणाऱ्या मजुरांपैक्की कुणीही हजर नसल्याने मोठी प्राणहाणी टळली. या पुलाचे छत कोसळल्याच्या निमित्ताने यावल तालुक्यात सार्वजनीक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन कशा प्रकारे निकृष्ठप्रतीची कामे होत आहे ते दिसुन आले आहे. दरम्यान तालुक्यात सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलेली कामे कोटयावधी रूपये खर्चुन केलेली रस्ते आदी कामे आज अदृष्य झाल्या सारखी आहे.