Home आरोग्य यावल शहरात कोरोनाचा प्रकोप वाढला; प्रशासकीय उपाययोजनेस प्रारंभ

यावल शहरात कोरोनाचा प्रकोप वाढला; प्रशासकीय उपाययोजनेस प्रारंभ

0
28


यावल अय्यूब पटेल । फैजपूर आणि कोरपावलीच्या पाठोपाठ आज यावल शहरासह तालुक्यातील दहिगाव येथे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणेने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील फैजपूर येथे दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले होते. यानंतर काल कोरपावली येथे दोन बाधीत आढळून आले आहेत. या पाठोपाठ आज यावल शहर आणि दहिगाव येथे रूग्ण आढळून आले आहेत. यात यावल शहरात दोन तर दहिगाव येथे एक रूग्ण आढळून आला आहे. यामुळे तातडीने संबंधीत रूग्णांच्या परिसरात फवारणी करण्यात आली असून त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

आज सायंकाळी ७ वाजता यावल तहसीलदार जितेन्द्र कुवर , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी तात्काळ बैठक घेवुन खबरदारीचा उपाय आरोग्य यंत्रणेसंदर्भात उपाययोजना म्हणुन यत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यावल शहरातील रूग्ण सुदर्शन मंदिराच्या परिसरातील असल्याची माहिती समोर आली असून हा परिसर सील करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound