विरावलीच्या सैनिक पुत्राने वाढदिवसासाठी साठविलेले पैसे दिलेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत

यावल,प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली येथील महेंद्र पाटील हे बीएसफमध्ये कार्यरत आहेत. ते सध्या त्रिपुरा येथे वास्तवास असून त्यांचा मुलगा योहित याने त्याने मिळविलेले स्पर्धेतील बक्षीस रक्कम व जमा केलेले पैसे महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीत कोरोना विरुद्धच्या लढाईत लढण्यासाठी ऑनलाईन ट्रान्स्फर केले आहेत.

योहित महेंद्र पाटील याने दि. ९ मे रोजी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हास्तरीय आयोजित ऑनलाईन प्रतियोगिता मध्ये रुपये ५५५ चे दुसरे बक्षीस पटकावले होते. त्याचे आजोबा तुळशीराम नामदेव पाटील रा.आहिरे, तालुका धरणगाव यांचे आशीर्वाद व मार्गदर्शनानुसार गल्ला बनविला होता. त्या गल्लात २५ मे रोजी वाढदिवस साजरा करण्यासाठी मागील १० महीन्यांपासुन जमा रक्कम रुपये ७१६/-जी त्याने जमा केले होते. योहित याने बक्षिसाचे ५५५ व त्याने जमा केलेले ७१६रुपये असे एकूण रुपये १२७१/- वाढदिवसावर खर्च न करता कोरोना विरूध्दच्या लढाई करीता गरीब जनतेला मदत होईल या समाजसेवेच्या भावनेतुन महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीत नुकताच ऑनलाईन ट्रान्स्फर केली आहे. वडील महेन्द्र पाटील हे देशाच्या रक्षणासाठी सिमारेषेवर त्रिपुरा येथे कार्यरत असुन देशासाठी काही करण्याची देशभावनेचा आर्दश त्यांनी आपल्या आजोबा आणि वडील यांच्याकडुन मिळाली असल्याची भावना चिमुकल्या योहीत पाटील यांने व्यक्त केली. त्याच्या या देशभावनेचे अनेकानी कौतुक केले.

Protected Content