फैजपुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही त्या अनुषंगाने गेल्या काही महिन्यां आधी शुभ दिव्य हॉल फैजपूर येथे तहसीलदार मोहनमला नाझीरकर मॅडम यांनी शिबिर आयोजित करून या शिबिरात जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांची पीएम किसान योजनेची अडचण दूर झाले. परंतु उर्वरित ३० टक्के लाभार्थी हे अजूनही लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे व त्यातच ही सर्व सिस्टीम आता कृषी विभागाकडे वर्ग झाल्यामुळे फैजपुर शहरातील जवळपास ५० ते ६० शेतकरी लाभार्थी अजूनही या योजनेपासून वंचित आहे कागदपत्रे देऊनही समस्या मार्गी लागत नसल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौधरी यांनी शेतकऱ्यांसह मा. सहाय्यक तालुका कृषी अधिकारी सिरणारे साहेब व सहाय्यक क्लर्क अक्षय शिरसाळे यांची भेट घेऊन यांना निवेदन सादर केले.
सदरील निवेदनावर सर्व शेतकरी बांधवांच्या सह्या असून या निवेदनाद्वारे ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटस वरती तुमच्या नावे शेत जमीन नाही असा शेरा आढळून येतो हा शेरा दूर झाल्यास उर्वरित शेतकऱ्यांची सुद्धा पीएम किसान योजनेचे मिळणारे रक्कम ही मिळू शकेल. यासंदर्भात यावेळी मासे कृषी अधिकारी यावल विभागामार्फत व जळगाव विभागामार्फत सुद्धा ही साईट चालत नसल्याने कामकाज कसे करायचे असा प्रश्न सुद्धा प्रशासनाला पडलेला आहे त्याच अनुषंगाने आज आयुक्त ऑफिस पुणे येथे सुद्धा संपर्क साधून ही अडचण तात्काळ दूर करण्याची मागणी संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांनी फोन द्वारे केली याला सकारात्मक पुणे ऑफिस वरून प्रतिसाद देऊन ही साईट कालच चालू करण्यात आली असून येत्या आठ ते पंधरा दिवसात शंभर टक्के अडचण सॉल करण्याचे आश्वासन संबंधित विभागाकडून देण्यात आले. यावेळी निवेदन देताना शेतकऱ्यांसमवेत येथील सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौधरी, रवींद्र होले, व्ही के कोल्हे, सुधीर महाजन, अभय महाजन, बाळू टोके, नारायण खाचणे, तुषार राणे यांच्यासह शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.