पाडळसरे प्रकल्पाला टीएसी प्रमाणपत्र : २८८० कोटींच्या निधीचा मार्ग मोकळा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तापी निम्न पाडळसरे प्रकल्पासाठी निधी मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असतांन केंद्रीय जलशक्ती आयोगाच्या वतीने मंगळवारी दिल्लीमध्ये सेंट्रल वॉटर कमिशनची तांत्रिक मान्यता टीएससी प्रमाणपत्र मिळाले असून गुंतवणूक परवानासाठी हा प्रस्ताव लागलीच दाखल होणार आहे.त्यांनतर या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश होवून २८८० कोटींच्या निधी मंजुरीचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी खासदार उन्मेष पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी ठरला आहे.

अमळनेर-तालुका व परिसरातील तालुक्यासाठी नवसंजीवनी ठरणार्‍या निम्न तापी पाडळसे प्रकल्पासाठी केंद्राचे दरवाजे खर्‍या अर्थाने खुले झाले असून केंद्र शासनाने दि १२ मार्च रोजी केंद्रीय जलआयोगाची मान्यता दिल्याने धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय योजनेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे आयोगाने २८८८ कोटींच्या पहिल्या टप्प्यास मान्यता देताना त्यात १५०० कोटींच्या लिफ्ट इरिगेशन योजनेचा समावेश केला असल्याने सर्व शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचनार असून सुमारे २५ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. आता केंद्रीय जल आयोगाच्या मान्यते नंतर पहिल्या टप्प्यासाठी इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स होऊन केंद्राच्या पीआयबी बोर्डाकडे प्रस्ताव जाणार आहे.
दरम्यान, या संदर्भात दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना खासदार उन्मेशदादा पाटील पुढे म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता. गेल्या ठाकरे सरकारच्या काळात अडीच वर्षे या संदर्भात कुठलेही हालचाल न झाल्यामुळे तो प्रलंबित राहिला.मात्र त्यानंतर आलेल्या महायुती सरकारच्या काळात या प्रकल्पाला गती मिळाली.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या संदर्भात हालचाली वेगाने झाल्याने प्रकल्पाला सुप्रमा मिळाली.आज केंद्र सरकारकडून टी एस सी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता गुंतवणूक परवाना (इन्व्हेस्टमेंट क्लीअरन्स सर्टिफिकेट) मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून एक फॉरेस्ट प्रमाणपत्र आवश्यक असून ते लागलीच मिळणार आहे. त्यानंतरच गुंतवणुक प्रमाणपत्र देण्यात येणार असून या प्रकल्पाला प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून २८८० रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

तर, या संदर्भात ना. अनिल पाटील म्हणाले की, अमळनेर तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकरी बांधव व जनतेसाठी खर्‍या अर्थाने ही गुड न्यूज असून सदर मान्यता ४० दिवसांपासून सतत पाठपुरावा सुरू होता. मान्यतेसाठी अनमोल सहकार्य केल्याबद्दल मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना अजित पवार,केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत तसेच जिल्ह्याचे मंत्री ना गिरीश महाजन,ना गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.याशिवाय सदर मान्यतेसाठी तापी महामंडळाच्या सर्व अधिकारी वर्गाने पाठपुरावा केला असून जिल्हाधिकारी यानीही विशेष लक्ष घातल्याचे मंत्री पाटील यांनी आवर्जून सांगितल

Protected Content