कौटुंबिक कारणावरून पतीकडून पत्नीला बेदम मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील हनुमान मंदीर परिसरात कौटुंबिक कारणावरून पतीकडून पत्नीला दारूपिऊन स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी ३ जून रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नेहा अजय राजपूत (वय-२५) या विवाहिता पती अजय पंडीत राजपूत यांच्यासोबत हनूमान मंदीर परिसरात वास्तव्याला आहे. हातमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. ३ जून रोजी सकाळी कौटुंबिक कारणावरून दोन्ही पती-पत्नीमध्ये वाद झाला. या दारूच्या नशेत असतांना अजय राजपूत याने पत्नी नेहा राजपूत यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी लाकडी पाटील, स्टीलचा रॉड याने बेदम मारहाण केली. दरम्यान विवाहितेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून पती अजय राजपूत याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहे.

Protected Content