किरकोळ कारणावरून वृध्दाला लोखंडी पाईपाने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगर परिसरात काहीही कारण नसतांना एका वृध्दाला शिवीगाळ करून लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी ४ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरेश रामचंद्र बाविस्कर (वय-६८) रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, समता नगर, जळगाव हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार ४ जून रोजी दुपारी वादळीवारा आल्याने घराचे पत्रे उडाले आहे का हे पाहण्यासाठी ते त्यांच्या घरी आले होते. त्यावेळी घराच्या बाजूला ओट्यावर बसलेले सनी उर्फ आकाश दादू अडकमोल किरण दादू अडकमोल आणि सचिन दादू अडकमोल यांनी काहीही कारण नसतांना सुरेश बाविस्कर यांना शिवीगाळ करून लोखंडी पाईपाने पाठीवर आणि डोक्यावर मारहाण केली. त्याने वृध्द जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याप्रकरणी सोमवारी ५ जून रोजी दुपारी ३ वाजता सुरेश बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सनी उर्फ आकाश दादू अडकमोल किरण दादू अडकमोल आणि सचिन दादू अडकमोल यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण जगदाळे करीत आहे.

Protected Content