काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रात सस्पेन्स कायम!

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । आगामी लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने आज १२ मार्च रोजी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पण या यादीमध्ये महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अदयाप सुटलेला नाही आहे. तोपर्यंत महाराष्ट्रातील काँग्रेसचे उमेदवार जाहीर होऊ शकणार नाहीत.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत ४३ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या ४३ उमेदवारांमध्ये ७ जनरल, १३ ओबीसी, १० एससी, ९ एसटी आणि १ मुस्लिम उमेदवाराचा समावेश आहे. ही यादी केसी वेणूगोपाल यांनी जाहीर केली आहे. या यादीमध्ये काँग्रेस खासदार गौरव गोगई यांना आसामच्या जोरहतमधून उमेदवारी देण्यात आली आहेत. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत जलोरेमधून निवडणूक लढतील, तसेच माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकूल नाथ छिंदवाडामधून निवडणूक लढतील. या यादीत आसाममधील १२ , गुजरातमधील ७, मध्यप्रदेशमधील १०, उत्तराखंडमधील ३, दीव-दमणमधील १ आणि राजस्थानमधील १० जागांवर उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे.

राजस्थानमधील बिकानेर येथून गोविंद मेघवाल, चुरु येथून राहुल कस्वा, झुंझुनू येथून बृजेंद्र ओला, अलवर येथून ललित यादव, भरतपूर येथून संजना जाटव. टोंक येथून हरीश मीणा, जोधपूर येथून करण सिंह उचियारडा, जालौर सिरोही येथून वैभव गहलोत, उदयपूर येथून ताराचंद मीणा, चितौड येथून उदयलाल आंजना यांचा समावेश आहे. काँग्रेसने मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथून नकुलनाथ, भिंड येथून फूल सिंह बरैया, टीकमगढ येथून पंकच अहिरवार, सतना येथून सिद्धार्थ कुशवाह, सीधी येथून कमलेश्वर पटेल, मंडला येथून ओंकार सिंह मरकाम, देवास येथून राजेंद्र मालवीय, धार येथून राधेश्याम मुवेल, खरगोन येथून पोरलाल खरते, बैतूल येथून रामू टेकाम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

`

Protected Content