नारायण राणेंना अटक करण्याची प्रक्रिया सुरू

चिपळूण | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले असून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक, महाड आणि पुणे येथे राणेंच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या पाठोपाठ आता जळगावातील शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक आज पहाटेच चिपळूण येथे रवाना झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांचे पथक चिपळूणला पोहचले. मात्र या पोलिसांकडे अटक वॉरंट नसल्याचा आरोप भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला आहे. तर पोलिसांनी अटकची तयारी केली आहे.

 

Protected Content