चाळीसगावात गारपिटीमुळे पिकांची नासाडी

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात शनिवारी रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली. या अवकाळी पावसासह गारपिटीने केळीसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा, अश्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी तहसीलदार अमोल मोरे यांना दिल्या.

तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसह काही ठिकाणी वित्तहानी देखील झाली आहे. आज संध्याकाळी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्याचे तहसिलदार अमोल मोरे यांच्यासोबत वाकडी शिवारातील सीताराम पाटील यांच्या शेतातील मका पिकाच्या व रोकडे शिवारातील दादा मानसिंग राठोड यांच्या केळी पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी गारपीट व अवकाळी पावसामुळे समोर अतिशय विदारक असे चित्र शेतांमध्ये पाहायला मिळाले. महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करावा अश्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी तहसीलदार अमोल मोरे यांना दिल्या.

 

Protected Content