कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार- मुख्य अभियंता राठोड

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दीपनगर येथील वीजनिर्मिती केंद्रातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील असे प्रतिपादन भुसावळ औष्णिक विज केंद्र दिपनगर येथे नव्याने रूजू झालेले मुख्य अभियंता विजय राठोड यांनी सत्कार समारंभ कार्यक्रमात केले.

भुसावळ औष्णिक विज केंद्र दिपनगर येथे नव्याने रूजू झालेले मुख्य अभियंता विजय राठोड यांचा सत्कार श्रमिक सेवा संघटनेतर्फे करण्यात आला. यावेळी प्रांतिय अध्यक्ष यासिन खान पठाण, प्रांतिय उपाअध्यक्ष सुरेश वरणकर, सचिव सचिन भिरूड, स्थानिक अध्यक्ष निश्चल झोपे, सचिव विनोद भिरूड, संघटनेचे सभासद पंकज चौधरी, पतंग माने, नितिन कोळी, शेख मुस्तफा, समाधान सपकाळे, अमोल बऱ्‍हाटे, किरण बऱ्हाटे, सचिन चौधरी, सचिन बोरोले, राकेश भिरूड, महिला प्रतिनिधी कांचन भारंबे, कोल्हे मॅडम आदी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्य अभियंता राठोड यांनी कामगार हिताचे निर्णय घेतले जातील. त्याचप्रमाणे सुरळीत वीजनिर्मितीसाठी कामगारांनी प्रयत्न केले पाहिजे तरच वीजनिर्मितीचा उच्यांक गाठला जावू शकतो. तसेच कामगारांच्या हिताचे  निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन  राठोड यांनी  स्वागत करतांना सांगितले.

Protected Content