ऑनलाईन मिडियात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी वेब मिडिया हे हक्काचे व्यासपीठ – अभिजित पाटील

पाचोरा प्रतिनिधी । इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल महाजन यांनी वेब मिडिया असोसिएशनची स्थापना करून राज्यभरात पत्रकारांना एक आधार देत हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. असे मत संघटनेचे राज्य निरीक्षक व संचालक सदस्य अभिजित पाटील यांनी मध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. 

ते पुढे म्हणाले की, तरुण तडफदार नेतृत्व, उच्च विचारसरणी, उत्तम संघटन कौशल्य असलेले सामाजिक व राजकीय क्षेत्रात ओ.बी.सी. बहुजनांसाठी लढा देत काम करणारे तसेच पत्रकारीता क्षेत्रातून सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाटचाल करणारे अनिल महाजन हे आहेत. क्षेत्र कुठलेही असो राजकारण असो की, समाजकारण असो  किंवा पत्रकारिता असो प्रत्येक क्षेत्रात एकी व संघटन असणे हे गरजेचे आहे. शेवटी कुठेही संस्था असो त्याला  महत्त्व असते किती लोक तुमच्या सोबत आहेत. संघटना कुठलीही असो एकी असल्यावर त्याला बळकटी मिळण्यासाठी तसेच न्याय व हक्कासाठी एक व्यासपीठ असणे गरजेचे असते. वेब मीडिया असोसिएशन, मुंबई ही एक देशपातळीवर चालणारी वेब मीडिया असोसिएशन आहे. पत्रकारांसाठी न्याय हक्क मिळवून देणारी संघटना आहे. राज्य शासन व प्रशासनात अधिकारी वर्गात व मंत्रालय स्तरावर प्रशाकीय विभागात, मेट्रो सिटी मध्ये सर्व ठिकाणी अतिशय दर्जेदार पकड वेब मिडियाच्या माध्यमातुनआहे. वेब मिडिया असोसिएशन स्थापन करून संस्थापक अध्यक्ष  वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन यांनी  सर्व ऑनलाईन मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांची राज्यभरात मोट बांधली आहे. आणि या डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना वेब मीडिया असोसिएशन स्थापन करून एक सन्मान मिळवून देत एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. यामुळे राज्यभरात अनेक पत्रकारांचा यांच्या वेब मिडिया असोशिएन या संघटनेमध्ये ओढ निर्माण झाली आहे. त्यामुळे वेब मिडिया असोसिएशनचे ग्रामीण भागात ऑनलाईन मिडियासाठी काम करणारे पत्रकारांचे खूप मोठ्या संख्येने संघटन वाढत आहे. राज्यभरात पत्रकांरासाठी चांगली काम करणारी संघटना आणि संघटनेचे नेतृत्व करणारे व्यक्ती खंबीर असेल तर त्या संघटने सोबत लोकं जुळतातच मग ती संघटना कुठल्याही क्षेत्रातली असो अशाच पद्धतीने वेब मीडिया असोसिएशन, मुबंई चे काम राज्यभर सुरू आहे. आगामी काळात अनेक सामाजिक उपक्रम राज्यभर या वेब मिडिया असोसिएशनच्या वतीने राबवली जाणार आहे. असे मत  संघटनेचे राज्य निरीक्षक व संचालक सदस्य अभिजित पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमांशी बोलतांना दिली आहे.

 

Protected Content