एरंडोल (प्रतिनिधी) खान्देशातील पारंपारिकरित्या महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया अर्थात आखाजी अवघ्या एक दिवसावर येऊन पोहचली आहे. या सणानिमित्त शहरातील बाजारपेठेत मातीच्या घागरी व विविध प्रकारच्या आंब्याची दुकाने थाटली असून या दुकानांमधून नागरिक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. एकंदरीत आखाजी निमित्त बाजारपेठ फुलली असल्याचे दिसत आहे.
आखाजी हा सण विशेषतः पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश परिसरात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गेले अनेक वर्ष झाले हा सण येथील नागरिक मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करतात. या सणाला पारंपारीक प्रचलित प्रथेनुसार आपल्या पूर्वजांना पाणी देण्यासाठी मातीची घागर भरून तिची यथोचित कुटुंबियांकडून पूजा कुटुंबांकडून केली जाते. तसेच या पारंपरिक रूढी प्रमाणे आज देखील पारंपरिक व जुन्या रूढी प्रमाणे शेतकरीवर्ग मातीच्या ढिघांवर पाण्याची घागर भरून पाण्याने भरलेली मातीची घागर ठेवून त्यावर ठेवतात. प्रत्येक ढिगाऱ्यास पावसाळ्यातील एक महिना मानून जो ढिगारा सर्वात जास्त ओला होईल त्या महिन्यात जास्त पाऊस पडेल असा शेतकरी अंदाज बांधतात. त्याचप्रमाणे शेतकरी आपल्या शेतीयुक्त अवजारांची पूजा देखील या दिवशी करतो. या सणानिमित्त घरोघरी आंब्याचा रस, पुरणपोळी तसेच सांजोऱ्या करंजा, गुळाचे लाडू, पापड्या असे विविध खाद्यपदार्थ परंपरेनुसार बनवतात. या दिवशी आपल्या जवळच्या मित्र किंवा ईस्ट मंडळांना भोजनासाठी बोलावले जाते.
सासरवाशी मुलींसाठी सुद्धा हा सण अत्यंत महत्वाचा आहे. कारण आखाजी सण साजरा करण्यासाठी सासुरवासी आपल्या वडिलांकडे म्हणजे माहेरला हा सण साजरा करण्यासाठी येत असतात. माहेरी आल्यावर या सासुरवाशिणी सासरचे सर्व दुःख विसरून माहेरी झोका बांधून खानदेशी गाणे म्हणून हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात. ‘आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय, हो कैरी तुटणी खडक झुई झुई पाणी व्हायव’ हे गाणं खूप प्रचलित आहे. पूर्वी या सणाचे मोठ्या शेतकऱ्यांमध्ये आपल्याकडे कोण सालदार लावायचा यासाठी खूप मोठी चढाओढ असायची. परंतु आजही खानदेशात आखाजीचा सण हा नागरिकांकडून मोठ्या उत्साहपूर्ण साजरा केला जातो.