शेंदूर्णी येथे कोरोना तपासणी शिबीर

शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील नगरपंचायतकडून आज रामनवमी दिवशी शासकीय सुट्टी असून कोरोना तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. 

तथापि, कोविड १९ प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून आले मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या आदेशानुसार तयार करण्यात आलेल्या पथकात कोरोना तपासणी तंत्रज्ञ उल्हास दवंगे ,जिवन चव्हाण हे नागरिकांची कोरोना चाचणी करत आहेत त्यासाठी नगरपंचायत जेष्ठ लिपिक विकास सपकाळ,दिनेश ठाकूर,पंकज गुजर,सागर गुजर , जगदीश गुजर,इरफान शेख, शिपाई सुनील निकम व विजय पाटील यांचे पथक कार्यरत करण्यात आले आहे.प्रभागात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत असलेल्या कोरोना तपासणी शिबिरास नागरिकांचाही प्रतिसाद लाभत आहे. या आधीही नगरपंचायत कडून गावातील भाजीपाला विक्रेते व फळविक्रेत्यांची तसेच छोटे मोठे दुकानदार यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

नगरपंचायतचे वतीने प्रभाग निहाय नागरिकांची अँटिजेंन चाचणी करण्यात येत असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे शेंदूर्णी नगरपंचायत मार्फत काल प्रभाग क्रमांक एक मधील शिवाजी नगर भागात कोरोना रुग्ण शोधमोहीम अंतर्गत शिबीर घेण्यात आले त्यात ९३ नागरिकांची तपासणी करण्यात आली तर आज दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजी अतुल नगर मधील हनुमान मंदिराजवळ तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यात ५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. 

शेंदूर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आठवड्यात दर सोमवार, बुधवार, व शुक्रवारी ४५ वर्षावरील नागरिकांचे कोरोना रोखण्यासाठी कोशिल्ड , कोव्याक्सिन लसीकरण करण्यात येत आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम,डॉ.शुभम साळवे यांच्या नेतृत्वाखाली मलेरिया सुपरवायझर,औषध निर्माता,टेक्निशियन, परिचारिका असा मोठा वर्ग कोविड १९ नियंत्रित करण्यासाठी अहोरात्र झटत आहे, लस उपलब्ध होताच लसीकरण वेग वाढविण्यात आला आहे, प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करण्याआधी  कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात येत असल्याने कोरोना प्रसार रोखण्यासाठी मदत होत आहे

 

 

 

Protected Content