महिलेच्या गळ्यातील मंगलपोत धुमस्टाईल लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सानेगुरूजी कॉलनीत शतपावली करत असतांना अज्ञात देन जणांनी दुचाकीवर येवून महिलेच्या गळ्यातील ४२ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगलपोत धुमस्टाईल लांबविल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी मानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील साने गुरूजी कॉलनी परिसरात वैशाली जितेंद्र मुणोत वय ४२ या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता वैशाली मुणोत या महिला आपल्या मुलीसह सानगुरूजी कॉलनीत शतपावली करण्यासाठी गेल्या. त्यावेळी समोरून दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी वैशाली मुणोत यांच्या गळ्यातील १४ ग्रॅम वजानाची ४२ हजार रूपये किंमतीच सोन्याची मंगलपोत ओढून नेली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने आरडाओरड केली तोपर्यंत दोघे भामटे पसार झाले. दुसऱ्या दिवशी शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करत आहेत.

Protected Content