Home Cities अमळनेर बस प्रवासात महिलेचे दागिने लांबविले

बस प्रवासात महिलेचे दागिने लांबविले

0
101

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बसस्थानक येथून बसमध्ये प्रवास करणाऱ्या विवाहितेची सोन्याची पोत आणि चांदीची चैन असा एकुण ३८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कडगाव नाक्याजवळ उघडकीला आले. याप्रकरणी रात्री ८.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील जोगलखेडा येथील सासर असलेल्या सलोनी उर्फ वैशाली प्रशांत पाटील वय १९ या विवाहिता माहेराहून सासरी जाण्यासाठी शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अमळनेर बसस्थानक आल्या. त्यावेळी ते बसमध्ये प्रवास करत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून सोन्याची पोत आणि चांदीची चैन असा एकुण ३८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सायंकाळी ६ वाजता कडगाव नाक्याजवळून प्रवास करत असतांना लक्षात आला. त्यांनी तिथेच बस थांबविली व सर्व शोधाशोध केली. परंतू त्यांना काहीही माहिती मिळाली नाही. अखेर रात्री ८.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound