महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर (व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 06 03 at 2.32.49 PM

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांची अंमलबजावणी व्हावी व पात्र पडताळणी झालेल्या कामगारांना कल्याणकारी मंडळाच्या मुलांचा त्वरित लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन तर्फ मोर्चा काढण्यात आला होता.

हा मोर्चा श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात काॅ. विजय पवार, हमिद अली कासम अली, युनूस खान, छगन सपकाळे, शिवदास सोनवणे, राजू फुलमाळी, जगन्नाथ आटे आदींसह महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. संघटनेच्या २०१६ पासून प्रलंबित असणाऱ्या कामगार कल्याणकारी मंडळाचे लाभ जसे आरोग्य, शिष्यवृती, औजार खरेदी पात्र लाभार्थी यांच्या यादीत नावे असून पडताळणीपासून आजपर्यत त्यांना याचा लाभ मिळाला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पहा कॉ . विजय पवार यांनी केलेल्या मागण्या

Add Comment

Protected Content