चाळीसगावचा अभिजात कलेचा वारसा प्रशंसनीय : रोशनी गुडघाटे

f177534f a5b7 4af5 8760 7abb62cd533b

चाळीसगाव (प्रतिनिधी) कलामहर्षी केकी मुस,गणितज्ञ भास्कराचार्य,जलतज्ञ माधवराव चितळे यांच्यातील अभिजात कलेचा वारसा चाळीसगाव तालुक्याला लाभला असून चाळीसगावची ओळख या थोर विभूतींनी जगाच्या पटलावर नेली असल्याचे,प्रतिपादन अमरावती येथील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका रोशनी गुडघाटे यांनी केले.

 

चाळीसगाव शहरात कामानिमित्त आलेल्या असतांना रोशनी गुडघाटे यांनी शहरातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.विनोद कोतकर यांची भेट घेत तालुक्यातील सांस्कृतिक घडामोडी आणि कलेविषयक असलेला आढावा जाणून घेतला.  यावेळी तुषार मुजुमदार,गौरव काळंगे,अजिंक्य त्रिभुवन आदी उपस्थित होते. पार्श्वगायिका असलेल्या रोशनी गुडघाटे यांनी अमरावती विद्यापीठातून शास्त्रीय संगीत या विषयात एम.ए केले असून आजवर त्यांनी राज्यात अनेकविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमातून आपल्या बहारदार आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. यात चाळीसगाव येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने दौऱ्यावर असतांना त्यांनी चाळीसगाव तालुक्याच्या जडणघडणीत असलेल्या कला सांस्कृतिक व राजकीय बाबींचा आढावा घेत माहीती जाणून घेतली.

Add Comment

Protected Content