कामतवाडी येथील अंगणवाडी मोजतेय शेवटच्या घटका (व्हीडीओ)

anganvadi amalner

 

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या वतीने बालकाचा मोफत शिक्षणाचा कायदयान्वये ‘गाव तेथे अंगणवाडी’ बांधण्याचा उपक्रम घेतला होता. परंतू कॉन्ट्रॅक्टदार अंगणवाडींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करीत असल्याचा धक्कादायक प्रकार कामतवाडी येथे उघडकीस आला आहे. येथील अंगणवाडी आजच्या घडीला शेवटच्या घटका मोजत आहे. धोकादायक इमारतीची स्थिती लक्षात घेता, सध्या अंगणवाडी ग्रामपंचायत ओटयावर भरवली जात आहे.

 

अमळनेर तालुक्यातील कामतवाडी या गावात शासनाच्या वतीने नवीन अंगणवाडी बांधण्याचे बांधकाम झाले.२०१६ -१७ यावर्षी नवीन आर.सी.सी पद्धतीने बांधकाम झाले. ही अंगणवाडी इमारत पडतीच्या मार्गावर आहे. दरवाजे तुटून पडली असून स्टाईल खचून गेलीय तर भितींना तळे पडले आहेत. ही इमारत कोणत्याही क्षणी मुलांच्या अंगावर येईल, सांगता येत नाही. गावातील शिक्षणप्रेमी नागरीकांनी परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेऊन अंगणवाडी सध्या ग्रामपंचायत ओटयावर भरवत आहेत. सदर काम निकृष्ट दर्ज्याचे असून त्याची सखोल चौकशी होऊन बोगस बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारवर कारवाई व्हावी, अशी मागणी तुकाराम पाटील, पंडित पाटील, गणेश भिल, गुलाब पाटील, दगडू पाटील, खेमराज पाटील, दत्तात्रय पाटील, गणेश पाटील, विजय पाटील, नरेंद्र पाटील, देवराम गायकवाड, भावलाल पाटील,किशोर गायकवाड यासह अनेक नागरीकांनी आमदार शिरीष चौधरी, गटविकास अधिकारी यांच्याकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.

 

Add Comment

Protected Content