सावखेडा येथील कोकिळाबाई अहिरे यांचे सरपंचपद, सदस्यत्व खंडपीठाकडून रद्द

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

जळगाव ,प्रतिनिधी । जिल्हयातील अंमळनेर तालुक्यातील सावखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच कोकीळाबाई अहिरे ( कोळी ) यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व औरंगाबाद खंडपीठाकडून रदद झाल्याने त्या सरपंचपदी देखील अपात्र झाल्या आहेत.

कोकीळाबाई कोळी या सावखेडा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्या होत्या. या ग्रामपंचायतीचे सरपंचपद (S.T.). राखीव असल्याने कोकीळाबाई कोळी यांनी आपण (S.T.). प्रवर्गातील असल्याने निवडणूक नामनिर्देशन पत्रात नमूद करुन सरपंचपदी निवडून आल्या. निवडणूकीचा अर्ज भरतांना व नंतर कोकीळाबाई कोळी यानी (S.T.). या प्रवर्गातील जातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे त्याचे ग्रामपंचायत सदस्यत्व रदद करुन त्यांना अपात्र घोषित करणेबाबत लेखी तक्रार गुलाब उखा भिल ग्रामपंचायत सदस्य सावखेडा यांनी जिल्हाधिकारी जळगांव याच्या कार्यालयात केली होती. चौकशी व सुनावणी दरम्यान जळगाव जिल्हाधिकारी यांनी कोकीळाबाई कोळी याचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केले. जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला कोकीळाबाई कोळी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून स्थगिती मिळविली. परंतू , तक्रारदार गुलाब उखा भिल यांनी औरंगाबाद खंडपीठात विधिज्ञ अॅड. अजय डी. पवार व अॅड योगेश एम. पाटील ( जवखेडा ता. अमळनेर) यांच्या मार्फत सदर याचिका तात्काळ सुनावणी घेणेकामी न्यायालयास विंनती करुन याचिकेत अंतिम सुनावणी केली. | सुनावणी दरम्यान तक्रारदाराच्या वकीलांनी कायदेशीर व मूददेनिहाय युक्तीवाद करून कोकीळाबाई कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र अद्याप सादर केलेले नसल्याने त्याची याचिका रद्द करणेबाबत तसेच त्याचे ग्रामपंचायत सदस्यत्व व सरपंचपद रद्द करण्यात यावे असा युक्तीवाद केला. सुनावणी होवून औरंगाबाद खंडपीठाने कोकीळाबाई कोळी याची याचिका रद्द करत तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत कोकीळाबाई कोळी याचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केले आहे.तक्रारदार यांच्या वतीने विविज्ञ अॅड अजय ही पवार व अॅड योगेश एम. पाटील ( जवखेडा| ता.अमळनेर ) यानी युक्तीवाद केला.

Protected Content