वादविवाद स्पर्धेत यश मिळावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा सत्कार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मानव अधिकार जनजागृती प्रित्यर्थ नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वाद विवाद स्पर्धा विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अमळनेर पोलीस कॉन्स्टेबल डॉ. शरद पाटील यांनी सहभाग घेवून तृतीय क्रमांक पटकावला. त्यामुळे त्यांचा अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी पो.नि.विजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पोलीस खात्यात काम करतांना स्वतःला अद्यावत ठेवणे अत्यंत मुश्किल गोष्ट! अशाही परिस्थितीत पोलिस हेड कॉन्स्टेबल डॉ.शरद पाटील सारखे हिरे स्वयंप्रकाशाने चमकतात ही केवळ आपल्यासाठी नाही तर पोलीस खात्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्हास याचा सार्थ अभिमान आहे. पोलीस स्टेशनचा तू गौरव आहेस! अशा शब्दात नावलौकिक करून सोबतच्या अंमलदारांना देखील प्रेरणा दिली आहे.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या चेहऱ्यावर देखील आपल्या सोबतच्या अंमलदाराने केलेल्या कामगिरीमुळे एक वेगळा उत्साह दिसून आला.

Protected Content