मजुराला मारहाण करत लुटले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसीतील किरण पाईप या कंपनीजवळ दुचाकीवरुन जाणाऱ्या मजुराला अडवून त्याला मारहाण करत त्याच्याकडील रोकड, मोबाईल लांबविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार, ५ ऑक्टोंबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील खेडी येथे विनायक नगरात जितेंद्र भास्कर काळे वय ३६ हे वास्तव्यास आहेत. ते ३ ऑक्टोंबर रोजी त्यांच्या दुचाकीने कामावरुन घराकडे परतत असतांना, एमआयडीसीतील किरण पाईप या कंपनीजवळ अनोळखी तीन इसमांनी जितेंद्र काळे यांची दुचाकी अडवली. तसेच तुझ्याकडे काय आहे ते काढून दे असे सांगितले, जितेंद्र काळे यांनी नकार दिला असता, तिघांनी जितेंद्रला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच जितेंद्रच्या शर्टाच्या खिशातील पाच हजारांचा मोबाईल, ३ हजार रुपये रोख व दुचाकीची चाबी असा एकूण ८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून घेत तिघेही पसार झाले. याप्रकरणी जितेंद्र काळे यांनी २ दिवसानंतर बुधवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून या तक्रारीवरुन जबरी चोरी करणाऱ्या अनोळखी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक निलेश गोसावी करीत आहेत.

 

Protected Content