गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस बाळगणार्‍या दोघांना अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारमध्ये खाजगी सुरक्षा रक्षकासह दोघांना गावठी पिस्टल व ५ जिवंत काडतूसांसह भुसावळ रेल्वे यार्ड जवळ अटक केल्याची कारवाई गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी पावणेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली.

योगेश महेश वंजारे ( रा. बौद्ध विहार, खडका, ता.भुसावळ) व विशाल भीमराव साळुंखे (रा. धुळे, ह.मु.खडका सबस्टेशनजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर कार मालक विलास सपकाळे (रा. शांती नगर, भुसावळ) हा पसार आहेत. तिन्ही संशयितांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांना गावठी पिस्टलासह संशयित येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. रेल्वे यार्डजवळ गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास संशयित कार (एमएच १९ बीजे ८१९९) मधून आल्यानंतर त्यांना पोलिसांना अडवत वाहनातील दोघा संशयितांची झडती घेत त्यांच्याकडून ३५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा तसेच ५ जिवंत काडतूस जप्त केले.

संशयितांनी हा गावठी कट्टी, पाच जीवंत काडतूस आणि कार विलास सपकाळे यांचे असल्याचे सांगितल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड, सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद, सहाय्यक फौजदार जाकीर सैय्यद, हवालदार सुपडा पाटील, नाईक विकास बाविसकर, कॉन्स्टेबल भूषण चौधरी आदींच्या पथकाने केली.

Protected Content