मानसिक आजारावर उपचार व समुपदेशन हीच गुरुकिल्ली – डॉ. नागोजी चव्हाण

भडगाव प्रतिनिधी । मानसिक आजार वाढत असल्याची अनेक कारणे आहेत. कोरोना महामारी, कौटुंबिक कलह, गर्दी, व्यसनाधीनता अशा अनेक कारणांमुळे मानसिक आजार होतो. त्यावर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. मार्गदर्शन ही मानसिक आजारावरील उपचार आणि समुपदेशनाची गुरुकिल्ली आहे. असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनी केले. ते भडगाव येथे मानसिक आरोग्य शिबिरप्रसंगी बोलत होते.

तहशिलदार मुकेश हिवाळे यांनी याप्रसंगी मानसिक आजाराबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मानसिक आजारावर वेळीच औषध उपचार घेतल्याने हा आजार नियंत्रणात राहतो व बरा होतो असे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. कांचन नारखेडे यांनी ही मार्गदर्शन केले. या शिबिरात एकूण १५७ रुग्णाची तपासणी करून त्यापैकी ११५ रुग्णांना औषध उपचार करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. कांचन नारखेडे, सूत्रसंचालन मानसतज्ञ दौलत निमसे तर आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. साहेबराव अहिरे यांनी मानले.

या प्रसंगी तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, मुख्य अधिकारी रविंद्र लांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता आकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील, तज्ञ मार्गदर्शक डॉ. सुरज पाटील उपस्थितीत होते.

शिबीर यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. साहेबराव अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील, जिल्हा मानसिक कार्यक्रम अधिकारी, डॉ. कांचन नारखेडे, मानसतज्ञ दौलत निमसे, मनो. सा. कार्यकर्त्या ज्योती पाटील, मनो. वि. परिचारक विनोद गडकर, प्रो. असिडन्ट मिलीद बरहाटे, चंद्रकांत ठाकूर, तसेच सर्व ग्रामीण रुग्णालय अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Protected Content