नांद्रा येथील स्मशानभूमीला मिळाली रोषणाई

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील नांद्रा येथील स्मशानभूमीत गत अनेक वर्षांपासून लाईटच नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. मात्र जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून स्मशानभूमीत सौरऊर्जेचा दिवा उपलब्ध झाले आहेत.

तालुक्यातील नांद्रा गावातील स्मशानभूमीत गेल्या अनेक वर्षांपासून विद्युतच्या अभावामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात काही दुर्दैवी दुर्घटना झाली. तर रात्री- अपरात्री अंत्यविधी करण्याचा योग आल्यावर गावातील सेवाभावी लोक आपआपले दुचाकी वाहन, ट्रॅक्टर व इतर वाहने आणून लाईट देत होते. अशा वेळी फक्त चितेच्या जवळच प्रकाश दिसत होता. परंतु इतर ठिकाणी संपूर्ण अंधार रहात असल्याने या गोष्टीची दखल घेत आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनातून व जि. प. सदस्य पदमसिंग (बापु) पाटील यांच्या परिश्रमातून विशेष निधीतून स्मशानभूमित सौरऊर्जाचा लॕम्प लावण्यात आले आहे. यामुळे स्मशान भूमित लखलखाट झाला आहे. याबाबत गावातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

याप्रसंगी जि. प. सदस्य पदमसिंग (बापु) पाटील, ग्रा. प. कमिटीचे उपसरपंच शिवाजी तावडे, विनोद तावडे, ग्रा. प. सदस्य किशोर खैरनार, बंटी सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते विनोद बाविस्कर, पत्रकार प्रा. यशवंत पवार, पकंज बाविस्कर, ऑपरेटर राहूल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Protected Content