Home क्राईम रावेरात बंद घर फोडले ; गुन्हा दाखल

रावेरात बंद घर फोडले ; गुन्हा दाखल

0
65
gharfodi
gharfodi

रावेर प्रतिनिधी । बंद घरातून चोरट्यांनी ३० हजार रुपये चोरून नेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  मदीना कॉलनीतील मोहोम्मद यूनुस शेख कलीम हे दि. ६ रोजी बाहेर गेल्याने त्यांचे घर बंद होते. बंद घरावर नजर ठेवत अज्ञात चोरट्याने अनाधिकृत घरात प्रवेश केला असून घरात ठेवलेले तीस हजार रुपये लंपास केले. याबाबत रावेर पोलिस स्थानकात मोहोम्मद यूनुस यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भादवी कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेंद्र सुरवाडे पुढील तपास करीत आहे.

 


Protected Content

Play sound