गाडी हळू चालविण्याचे सांगिल्यावरून तरूणासह आजीला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गाडी हळू चालविण्याचे बोलल्याच्या रागातून जळगाव शहरातील तांबापूरा परिसरातील महादेव मंदीर परिसरात एका तरूणासह त्यांच्या आजीला लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना गुरूवार ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रथमेश अनिल परटे वय १९ रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवारी ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रथमेश परटे हा तांबापूर येथील काकाकडे भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी तांबापूर येथील महादेव मंदीराजवळ प्रथमेश हा उभा होता. त्यावेळी प्रथमेश याने गाडी हळू चालवा असे सांगतले. याचा रागा आल्याने दुचाकीवरून शादाब रफिक बागवान आणि दानिश शेख दोन्ही रा. तांबापूरा यांनी प्रथमेश याला लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरूवात केली. भांडण सुरू असतांना प्रथमेश यांची आज सिंधुबाई परटे ह्या भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील दोघांनी काठीने मारहाण केली. यात दोघेजण जखमी झाले. याप्रकरणी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीसात दोघांविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी शादाब रफिक बागवान आणि दानिश शेख दोन्ही रा. तांबापूरा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहे.

Protected Content