संतापजनक ! दोन दिवसांच्या मृत अर्भकाला उघड्यावर टाकलं

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर ते चोपडा रोडवरील फरशी रोडवर एका दोन दिवसांचे पुरूष जातीचे अर्भक मयत स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, अमळनेर ते चोपडा रोडवरील बोरी नदीच्या फरशीपुलाच्या खाली एक अर्भक मयतस्थितीत आढळून आल्याने अमळनेर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ संजय पाटील आणि घनश्याम पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. यावेळी नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, हे अर्भक कुणाचे आहे याबाबात कोणतीही माहिती मिळाली नाही. याबाबत पोलीसांनी चौकशीला कसुन सुरूवात केली आहे. दरम्यान, पोलीसांनी पंचनामा करून अर्भकाचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोहेकॉ संतोष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहे.

Protected Content