मुंबई (वृत्तसंस्था) बहुमत कोणत्या पक्षाकडे, हे राज्यपाल ठरवू शकत नाही. दावा करणाऱ्या पक्षाला संधी दिली पाहिजे, असा दावा करत शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांनी ही याचिका दाखल केली आहे.
एकीकडे राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरु असताना, शिवसेनेने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्याला नकार दिला. शिवसेनेने त्यावर आक्षेप घेत, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. शिवसेनेने त्यासाठी सुप्रीम कोर्टातील वकील आणि काँग्रेस नेते- माजी मंत्री कपिल सिब्बल यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बहुमत कोणत्या पक्षाकडे, हे राज्यपाल ठरवू शकत नाही. दावा करणाऱ्या पक्षाला संधी दिली पाहिजे होती. राज्यपाल हे भाजपच्या सल्ल्याने वागले, असेही याचिकेत म्हटले आहे. राज्यपालांनी भाजपला जास्त आणि शिवसेनेला कमी वेळ दिल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे.