‘विद्यापीठ विद्यार्थ्यांचे की भ्रष्ट दलालांचे ?’ – जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रश्न विचारत दिले निवेदन

जळगांव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सावंत जिल्हा दौऱ्यावर आले असता जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी विद्यापीठ विद्यार्थ्यांचे की भ्रष्ट दलालांचे ? असा प्रश्न उपस्थीत करून विद्यापीठाच्या विविध तक्रारी निवेदनाद्वारे दिल्या.

प्राध्यापक भरती बंद असतांना प्राध्यापक भरती परवानगी कशी ?

ऑनलाईन परीक्षेच्या ५ कोटी बिलाच्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी यासह तत्कालीन कुलगुरु पी पी पाटील यांच्या काळात प्राध्यापक भरती बंद असतांना आपल्या मर्जीतील फैजपूर महाविद्यालयाला भरतीची परवानगी कशी दिली जाते या चौकशीची मागणी करण्यात आली

प्रा. भटकर प्रकरणात एका विद्यार्थिनीच्या विनयभंग होऊन देखील अजून चौकशी का नाही ? तत्कालीन प्र कुलगुरू पी पी माहुलीकर यांच्या चौर्य प्रकरणाची चौकशी का थांबविण्यात आली. असे प्रश्न विचारत सुरक्षा रक्षकांच्या पगार बिलाच्या घोटाळ्याची आणि न्या. व्यवहारे यांच्या राजीनाम्याची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात केली आहे.

याप्रसंगी ‘एनएसयुआय’चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, अॅड.कुणाल पवार , भूषण भदाणे आदी. उपस्थित होते.

Protected Content