जळगाव प्रतिनिधी | अडगळीच्या जागेवर कोंबडीने दिलेलं अंड काढण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय तरूणाला सापाने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना चिंचपूरा ता.जामनेर येथे घडली. याबाबत जामनेर पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ललित दिलीप जोहारे वय 20 रा चिंचपूरा ता जामनेर हा आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास अडगळीच्या जागेवर कोंबडीने दिलेल अंड काढण्यासाठी हात घातला असता सापाने उजव्या हाताला चावा घेतला त्याला प्राथमिक उपचारासाठी जामनेर रुग्णालयात दाखल केले त्यानंतर तातडीने शासकीय रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी मदत घोषित केले याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. मयत ललित जोहारे यांची आई मथुराबाई जोहारे यांचे 8 वर्षांपूर्वी विषारी औषध सेवन करून मयत झाली होती. त्याचा राग मनात ठेवून मयत ललित जोहरे यांच्या मावशीच्या नातेवाईकांनी दिलीप धोंडू जोहरे यांच्यासह सावत्र आई तिला मारहाण केली.