जळगावातील कार्तिक स्वामी मंदीरात भाविकांची गर्दी (व्हिडीओ)

kartik swami news

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पांझरापोळ संस्थानमध्ये असलेल्या कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमेला भाविकांची दर्शनासाठी आज सकाळपासून गर्दी झाली होती. रात्री उशीरापर्यंत हे मंदीर दर्शनासाठी खुले असणार असल्याची माहिती संस्थानचे व्यवस्थापक सुरेश सोनार यांनी सांगितले.

कार्तिक पौर्णिमेला लक्ष्मी आणि कुबेर कार्तिक स्वामींच्या भेटीला येतात, अशी आख्यायिका आहे. या दिवशी दर्शन घेण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जात असल्याने भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनसाठी आणि पूजेसाठी येतात. यंदाही भाविकांनी या मंदिरात दर्शनसाठी रांगा लावल्या. मंदिरात शुक्रवारी सकाळी १० वाजता अभिषेक पूजा करण्यात आली, त्यात शुद्ध जल, उसाचा रस, पंचामृत आदींनाचा अभिषेक करण्यात आला. या दिवशी दर्शन घेऊन पूजा केली तर बुद्धी व अर्थवृद्धी होत असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होण्याच्या आशेने भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी असते.

कार्तिक पौर्णिमा मंगळवारी (दि. 12) सायंकाळी 7 वाजून 03 मिनिटांनी संपत असल्याने सोमवारी सायंकाळी भाविकांची गर्दी वाढली. ती रात्री उशिरापर्यंत होती. तसेच मंगळवारीही सकाळी गर्दी होती. कृतिका नक्षत्र मंगळवारी (दि. 12) रोजी सायंकाळी 07 वाजून 03 मिनिटांनी संपते.

Protected Content