श्री. स्वामी समर्थ केंद्रात अखंड नामजप यज्ञ याग सप्ताहाला सुरुवात

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा संघवी कॉलनी स्थित दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्रात आज १२ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजेपासून अखंड नामजप यज्ञ याग सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.

 

सलग ७ दिवस चालणाऱ्या या सप्ताहात शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ३५० बंधु भगिनी सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या अखंड नामजप यज्ञ याग सप्ताहात १२ एप्रिल रोजी मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, १३ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार श्री. गणेश याग, श्री. मनोबोध याग, १४ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार चंडीयाग १५ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार स्वामी याग, १६ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार श्री. गीताई याग, १७ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार रुद्र याग – मल्हारी याग, १८ एप्रिल रोजी बलीपुर्णाहुती सत्यदत्त पुजन अखंड हरिनाम जप यज्ञ तद्नंतर सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. या सप्ताहात पाचोरा येथील दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्राचे केंद्र प्रमुख गोकुळ पाटील, तालुका प्रमुख राम जळतकर, डी. पी. वाणी, नरेश गर्गे, संजय पाटील, पी. के. सिनकर, भरत गायकवाड, सुभाष पाटील, गणेश वाणी, बी. जे. पाटील यांचेसह शहरातील तसेच ग्रामीण भागातील असंख्य बंधु भगिनी सेवेकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

Protected Content