तालुका खो-खो स्पर्धेत मुलींच्या संघाने मारली बाजी

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई  फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने बाजी मारत उपविजिते पद पटकावले आहे .

 

१८ ऑगस्ट रोजी जामनेर येथील लॉर्ड गणेशा इंग्लिश  स्कूलच्या मैदानावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे, जिल्हा क्रीडा धिकारी कार्यालय व जिल्हा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.  यात सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील १४ वर्षे खालील व १७ वर्षे खालील वयोगटातील मुलींच्या दोन संघांनी सहभाग नोदविला . यातील १७ वर्षे वयोगटा खालील मुलींच्या संघाने बाजी मारत उपविजेते पद पटकावले . शालेय क्रीडा विभाग प्रमुख हरिभाऊ राऊत यांचे विद्यार्थीनीना मार्गदर्शन लाभले . या संघाचे नेतृत्व खुशी गणेश घोंगडे हिने केले .

 

या संघात जागृती रविंद्र चौधरी, जयश्री रामचंद्र घोंगडे , गायत्री सोपान तनपूरे ,  तृप्ती हिरालाल घोंगडे , मानसी युवराज बोरसे , ममता विष्णु घोंगडे ,   हर्षदा ज्ञानवंत उभाले , स्नेहल संदीप सपकाल , जागृती सिद्धेश्वर घोंगडे , कल्याणी संदीप जाधव , श्रृती रामेश्वर कुमावत , शितल संदिप बारी , हर्षाली दिपक जाधव , मोनीका अनिल घोंगडे आदी विद्यार्थीनीनी या स्पर्धेत   उत्स्फुर्त सहभाग नोदविला . त्यांच्या  यशा बद्दल संस्था अध्यक्ष आदरणीय बाबूराव आण्णा घोंगडे , संस्था सचिव आदरणीय भगवान आण्णा घोंगडे , मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली घोंगडे , तालुका क्रिडा समन्वय प्रा आसिफ खान, जेष्ठ शिक्षिका श्रीमती कल्पना बनकर सह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .

Protected Content