नंदिनीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा एचएससी परीक्षेचा 100 टक्के निकाल

जळगाव, प्रतिनिधी । येथील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा एच.एस.सी.परीक्षेचा निकाल जाहिर झालेला असून 100 टक्के निकालाची परंपरा कायम राहिली आहे.

 

कला, विज्ञान,वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून विज्ञान शाखेतील वैष्णवी प्रविण बारी  ही विद्यार्थिनी शेकडा 93.17टक्के गुण मिळवून कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आलेली आहे.  कला शाखेतून  शिवानी हरीदास जाधव ही 86.67 टक्के ,वाणिज्य शाखेतून  मयुरी युवराज मराठे ही विद्यार्थिनी शेकडा 91.67 मिळवित प्रथम आलेल्या आहेत.कनिष्ठ महाविद्यालयात एकूण 149 विद्यार्थिनी शेकडा 80 टक्क्यांच्या वर गुण मिळवित विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे सचिव प्रा.एन.एस.पाटील व कनिष्ठ विद्यालयाच्या प्राचार्या सी.एस.पाटील,उपप्राचार्या सौ. एस. एस. नेमाडे सर्व उपशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 

Protected Content