वरणगाव फॅक्टरी आवारातून दुचाकी लांबविली

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव फॅक्टरी परिसरातील सुशिल नगर येथे राहणाऱ्या एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सुरेश रामचंद्र सुरवाडे (वय-४५) रा. सुशिल नगर, वरणगाव फॅक्टरी, ता.भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १३ ऑक्टोबर रोजी त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ सीसी ८२६१) घराच्या समोर पार्कींगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळून आली नाही. अखेर सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नविद अली सैय्यद हे करीत आहे.

Protected Content