केळी व्यापाराची फसवणूक ; सिताराम कोल्ड स्टोअरेजविरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी ।  शहरातील केळी व्यापाराने हरियाणातील सिताराम कोल्ड स्टोअरेज नावाच्या कंपनीला ३२ लाख रुपयांचा केळीचा माल दिला होता. मात्र, कंपनीने उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे अखेर व्यापाऱ्‍याने शहर पोलीस ठाण्‍यात धाव घेत कंपनीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुर्यकांत मदनराव विधाते (रा. शिवराम नगर) यांनी हरियाणातील सिताराम कोल्ड स्टोअरेज नावाच्या कंपनीला ३२ लाख रुपयांचा केळीचा माल दिला होता. कंपनीकडून  ३ जुलै २०१९ पर्यंत  २६ लाख ४२ हजार १०० रुपये चेक व आरटीजीएसद्वारे सुर्यकांत यांना मिळाले. तर उर्वरीत ५ लाख ८७ हजार ७४८ रुपयांची रक्कम त्यांच्याकडून मिळणे बाकी असून याबाबत सुर्यकांत यांनी वारंवार कंपनीकडे फोनद्वारे मागणी केली. तरी सुध्‍दा त्यांना रक्कम मिळाली नसून उर्वरित रक्कम ही देण्‍यास कंपनीकडून टाळाटाळ करीत असल्यामुळे अखेर व्यापा-याने शहर पोलीस ठाण्‍यात घेवून तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ५ लाख ८७ हजार ७४८ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी  हरियाणातील सिताराम कोल्ड स्टोअरेज कंपनीविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे

अनंत श्री शिवराम नगरातील रहिवासी सुर्यकांत मदनराव विधाते (६६) यांचा केळीचा व्यापार आहे. सुर्यकांत हे शेतकर्‍यांकडून केळी घेवून ते इतर राज्यातील व्यापार्‍यांना त्याच ठोक विक्री करतात. ३० सप्टेंबर २०१८ ते २१ जून २०१९ पर्यंत सुर्यकांत विधाते यांच्या जयकिसान केला सप्लायर्स या दुकानातून हरियाणा येथील सिताराम कोल्ड स्टोअरेज (रा. प्लॉट नंबर ०९ मंगल कॉलनी, पार्ट २ हंसी रोड कर्नाल) यांच्याकडे त्यांच्याकडील कर्मचारी चांद व ओम (दोघांचे पूर्ण नाव माहित नाही) यांनी त्यांच्या मालकाच्या सांगण्यावरुन वेळोवेळी माल घेवून गेले होते. हा माल मिळाल्याचे कोल्ड स्टोअरेजचे मालक यांनी देखील सुर्यकांत यांना कळविले होते. दरम्यान सुर्यकांत यांनी पाठविलेला माल सिताराम कोल्ड स्टोअरेज कंपनीने विश्‍वास घात करुन हा माल स्वताच्या फायद्यासाठी विक्री केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

Protected Content