Home Cities जामनेर सहाय्यक फौजदार अनिल अहिरे यांना पहूर येथे निरोप

सहाय्यक फौजदार अनिल अहिरे यांना पहूर येथे निरोप

0
66


पहूर , ता .जामनेर प्रतिनिधी । पहूर पोलीस स्टेशनचे  सहाय्यक फौजदार अनिल अहिरे यांची पिंपळगाव हरेश्वर येथे तर राजू पाटील यांची भडगाव येथे बदली झाली.  त्या निमित्त त्यांना पहूर पोलिस स्टेशनला निरोप देण्यात आला .

पोलीस ठाण्यात निरोप समारंभा प्रसंगी श्री . अहिरे व श्री . पाटील यांचा  सत्कार करण्यात आला.  अनिल अहिरे यांनी पहूर पोलीस स्टेशनला तब्बल सात वर्षे सेवा व आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटविला. मिळून मिसळून वागणारे व कुठलाही वाद, तंटा मिटवुन गोडी गुलाबीत समेट घडवून आणण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणूनच जण सामांन्यांच्या मनात अहिरे यांनी मानाचे स्थान मिळविले.    

यावेळी निरोप समारंभा निमित्त आयोजित सत्कार प्रसंगी  पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे , संदिप चेडे , शशिकांत पाटील,  ज्ञानेश्वर ठाकरे, जीतूसिंग परदेशी, भरत लिंगायत, ज्ञानेश्वर बाविस्कर,  अनिल राठोड,  श्री .सानप, श्री .चौधरी,  जगदीश चौधरी, हिरा बारी,  अमोल क्षीरसागर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound