मयत आदिवासी बालकाच्या कुटुंबाला मिळणार शासनाची आर्थिक मदत

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील साकळी शिवारात एका शेतकऱ्याच्या बागेत एका सात वर्षीय आदिवासी बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले असून, मृत बालकाच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्य शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती वनविभागातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

( प्रतिकात्मक संग्रहीत छायाचित्र )

ही घटना ६ मार्च रोजी दुपारी २ ते २:३० वाजण्याच्या सुमारास घडली. साकळी परिसरातील गट क्रमांक ४७२ मध्ये, केतन सुरेश चौधरी (रा. किनगाव) यांच्या शेतात मजुरी करणाऱ्या आईसोबत असलेल्या पेमा बुटसिंग बारेला या सात वर्षीय बालकावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र शासनाने मृत बालकाच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यावल (जळगाव) वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी १० लाख रुपये शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ दिले जातील, तर उर्वरित रक्कम मृत बालकाच्या पालकांच्या नावे सुरक्षित ठेव म्हणून ठेवली जाईल.

Protected Content