हरेश्वर नगरातील घरात आढळला तरुणाचा कुजलेला मृतदेह

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील रिंगरोड परिसरातील हरेश्वर नगरात एका घरात एकटेच वास्तव्यास असलेल्या तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना शनिवार, १५ जून रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहुल अशोक सुर्यवंशी (वय ४४, मूळ रा. मूर्तीजापूर, जि. अकोला, ह. मु. हरेश्वर नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. मूर्तीजापूर येथील राहुल सुर्यवंशी हे हरेश्वर नगरात एकटेच राहून मिळेल ते काम करायचे. गेल्या दोन दिवसांपासून शेजारच्यांना त्यांच्या घरातून उग्र वास येत असल्याने त्यांनी शनिवारी १५;जून रोजी सकाळी ८ वाजता सकाळी पोलिसांना माहिती दिली. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी तेथे पोहचले व घराचा दरवाजा तोडला असता, सुर्यवंशी हे घरात कुजलेल्या अवस्थेत सापडले.

पोलिसांनी घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिल्यानंतर मयताचे भाऊ अतुल सुर्यवंशी हे जळगावात आले. त्यांनी मयत राहुल यांची ओळख पटवली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, भाऊ, बहिण असा परिवार असल्याची माहिती मिळाली.

Protected Content